सध्या देशात चर्चेचा विषय ठरलेल्या ज्ञानवापी( Dnyanvapi ) मशिदीचे प्रकरण न्यायलयात (Cort) पोहचले असून आता ज्ञानवापी प्रकरणी स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांना नजरकैदेत (Incarceration) ठेवण्यात आले आहे . स्वामी अभिमुक्तेश्वरानंद (Swami Abhimukteshwarananda )यांनी ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी (police ) कारवाई करत त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. अभिमुक्तेश्वरानंद यांच्या विद्यामठाबाहेर (Vidyamath) मोठ्या संख्येने पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.
स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी “मी प्रशासनाला वारंवार विनंती करतो आहे की आम्हाला ज्ञानवापी ( Dnyanvapi ) मशिदीत पूजा करू दिली जावी. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना मागे ठेवलं आहे. केवळ मला एकट्याला १०० कोटी सनातन (sanatan) धर्मियांच्या वतीने प्रकट झालेल्या देवाची पूजा करू द्यावी.” अशी मागणी करत ज्ञानवापीत पूजा करण्याचा इशारा (Gesture)दिला आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती श्रीविद्या मठाच्या गेटवरच उपोषणाला बसले होते.
जोपर्यंत ज्ञानवापीमध्ये प्रकटलेल्या आदि विश्वेश्वर शिवलिंगाची (shiv ling )पूजा करणार नाही, तोपर्यंत अन्नपाणी घेणार नाही. असे देखील सांगितले होते. ‘ज्ञानवापीमध्ये (Dnyanvapi )सापडलेले शिवलिंग हे आमचे आदिविश्वेश्वराचे जुने ज्योतिर्लिंग आहे. देवतेची पूजा केली जाते, कारण त्यात प्राण असतात. देवाला उपाशी (Starvation ) किंवा तहानलेले ठेवता येत नाही. त्यांचे स्नान, श्रृंगार, पूजा, भोग-राग हे नियमित असले पाहिजेत.”असे म्हणत दिवसातून एकदा पूजा करण्याची परवानगी (Permission) द्यावी अशी देखील मागणी केली होती.
शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या आदेशाने पूजा करणार असल्याच जाहीर केलं होते असे केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई (Action) करण्याचा इशारा दिला त्यानंतर आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या विद्यामठाबाहेर दहा (Ten) पोलीस ठाण्याचे (steshan) पोलीस तैनात करण्यात आले असून परिसरात नाकाबंदी देखील लागू करण्यात आली आहे.
विश्व हिंदू सेनेचा रक्तभिषेक करण्याचा इशारा
स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्यानं आणि विद्यामठाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे जर धर्माचार्यांना वाईट वागणूक दिली तर काशीतील प्रत्येक मंदिरात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात रक्तभिषेक करण्यात येईल अशा इशारा विश्व हिंदू सेनेने दिला आहे.