नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; पोलिस तपास सुरु

नाशिक : शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात करण्यात आला आहे. हा हल्ला महात्मा गांधी रोड येथे झाला.महात्मा गांधी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ अज्ञात हल्लेखोरांकडून धारदार शस्त्राने हल्ला केला आला, ही घटना सोमवारी रात्री, ९ ते १० च्या सुमारास महात्मा गांधी रोडवर घडली. हा हल्ला मध्य नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे यांच्यावर झाला आहे. हल्ल्यात कोकणे यांच्या पाठीमागून धारदार व टणकवस्तूने प्रहार करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे कोकणे रक्तबंबाळ झाले होते. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना सरकारवाडा पोलिस ठाण्याजवळील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस चौकीचा तपास चालू आहे. दरम्यान हल्लेखोराने प्राणघातक हल्ला केला आणि त्याच क्षणी घटनास्थळावरून पळ काढला, घटनेची माहिती मिळताच भद्रकाली, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे गस्ती पथके घटनास्थळी दाखल झाली.

हल्ला का झाला? व तो का करण्यात आला हे कारण अद्याप स्पष्ट नाही, पण घटनेचा तपास भद्रकाली पोलिस चौकीत तपास सुरु आहे, हल्लेखोरांचा पोलिस शोध घेत असल्याचे भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर हे तीन किंवा चार असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणे यांची परिस्थिती स्थिर असून, सुदैवाने कोकणे या हल्ल्यातून बचावले आहेत. सध्या राज्यात शिवसेनेत दोन गट पडलेले आहेत. तर या हल्ल्याचे आणि राज्यातल्या राजकारणाचा काही संबंध तर नाही ना? अश्या प्रकारच्या चार्चानाही उधान आले आहे. त्यामुळे पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.