नाशकात टोलनाक्यावर कर्मचारी आणि पोलीस पत्नीत दे दणादण ; पहा व्हिडिओ

नाशिकच्या पिंपळगाव टोल नाक्यावर महिला कर्मचारी आणि एका महिलेमध्ये तुंबळ मारहाण झाली आहे. टोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून पोलीस पत्नी आणि महिला कर्मचारी यांच्यात धरपकड झाल्याचं समजतंय. हाणामारी सुरू होती तेव्हा सीआरपीएफ पती देखील महिलेसोबत उपस्थित होता. मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफ पतीने शासकीय कार्ड दाखवून खाजगी वाहन सोडण्याची विनंती केली. मात्र टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी कार्ड चालणार नसल्याचं सांगितलं. अशात पैसे देऊन टोल भरल्यानंतर वाहनात बसलेली पोलीस पत्नी आणि महिला टोल कर्मचाऱ्यात शाब्दिक बाचाबाची झाली.वाद विकोपाला गेल्याने दोन्ही महिलांमध्ये टोलनाक्यावर तुंबळ हाणामारी झाली. पिंपळगाव पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या मध्यस्थी व माफीनाम्या नंतर वादावर पडदा पाडला. दरम्यान काही न काही ना काही कारणामुळे चर्चेला येणारा पिंपळगाव टोल नाका या हाणामारीमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय.


….अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला

पिंपळगाव बसवंत टोलनाका पुन्हा नव्या वादाने चर्चित आला आहे. बुधवारी सायंकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणाहून महिला टोल कर्मचारी आणि पोलीस पत्नीत यांच्यात टोल भरण्यावरून हानामारीचा प्रकार घडला. पिंपळगाव पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या मध्यस्थी आणि माफीनाम्यानंतर वादावर पडदा पडला. याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान आपल्या पत्नी आणि दोन मुलांसमवेत पुणे येथे जात असताना बुधवारी सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर आपले शासकीय कार्ड दाखवून खाजगी वाहन सोडण्याची विनंती केली. टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरवाच लागेल कार्ड चालणार नाही असं सांगितलं. सदर पोलीस कर्मचाऱ्याने पैसे देऊन टोल भरल्यानंतर वाहनात बसलेली पोलीस पत्नी व महिला टोल कर्मचाऱ्यात शाब्दिक बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्याने दोन्ही महिलांमध्ये टोलनाक्यावर तुंबळ हाणामारी झाली. काही वेळानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर टोल कर्मचारी यांनी सुरवातीला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस प्रशासनाने दोन्ही तक्रारदार यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर परस्पर वाद मिवटवीत सबुरीचा सल्ला दिला. टोल कर्मचारी यांच्या सयुक्तिक मागणीनंतर माफीनामा लिहून देत वादावर पडदा टाकण्यात आला.

पहा व्हिडियो :

या टोल नाक्यावरचं हे कायमचंच….

या आधी पिंपळगाव टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्याने एका दैनिकाच्या उपसंपादकाला बातमी दिली म्हणून दमबाजी केली असल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर लगेचच चक्क पोलीस अधीक्षकांची गाडी अडवून त्यांच्यासोबत हुज्जत घालत अरेरावी केल्याची घटना देखील याच टोलनाक्यावर घडली होती. पिंपळगाव कडून नाशिकच्या दिशेने ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांची गाडी जात असताना टोलनाक्याच्या लेन जवळ आल्यानंतर स्वतंत्रलेन बंद असल्याने गाडी दुसऱ्या लेनला गेली, मात्र १५ ते २० मिनिटे होऊनही लेन ओपन होत नसल्याने पोलीस अधीक्षक यांनी याबाबत विचारणा केली तेव्हा कर्मचाऱ्यांनी गाडी जाऊ दिली नाही आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी हुज्जत घालत अरेरावी केली त्यामुळे नाईलाजाने संतापून पोलीस अधीक्षक यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्याची संपर्क साधला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होत.

तर या सर्व घटनांच्या आधी देखील कधी युवतीस मारहाण, कधी दमबाजी दाखवून टोल वसूल करणं, कधी पोलिसांशी हुज्जत घालणं तर कधी अशा प्रकारे हाणामारीचे किस्से या टोल नाक्यावर घडतच असतात. त्यामुळे या टोल नाक्या संदर्भात अशी काही बातमी आली की ‘इथलं हे कायमचंच’ अशाच प्रतिक्रिया नागरिकांच्या असतात.