Home » नाशिकमधील PFI प्रकरणातील संशयितांना ATS कोठडी..!

नाशिकमधील PFI प्रकरणातील संशयितांना ATS कोठडी..!

by नाशिक तक
0 comment

नाशिकमधील एनआयएच्या पीएफआय छापेमारी प्रकरणातील ५ संशयित आरोपींना ३ ऑक्टोबरपर्यंत ATS कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींना ३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. पाच आरोपींना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ३ ऑक्टोबर पर्यंतची ATS कोठडी सुनावण्यात आली आहे. या पाचमधील एकजण मालेगावचा आहे. २ संशयित आरोपी कोंढवा- पुणे येथील आहे. १ कोल्हापूर आणि १ संशयित आरोपी बीड येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

पी एफ आय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर सुरू असलेली तपास यंत्रणांची छापीमारेची व्याप्ती वाढत चालली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी एन आय ए आणि एटीएस पथकं या संघटनेवर छापे टाकत आहेत. नाशकात देखील छापे टाकत
या संघटनेतील ५ सदस्य ताब्यात घेतले होते. मौलाना सैफ रहमानी (हुडको, मालेगाव, नाशिक), अब्दुल कययूम शेख (कोंढावा पुणे), राझी अहमद खान (कोंढवा पुणे), वसीम शेख (मुन्ना) बीड, नशीब मुल्ला (रबी सहाब मुल्ला) कोल्हापूर अशी त्यांचे नवे असून त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत ATS कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळी केलेल्या कारवाईनंतर एन आय ए आणि एटीएस पथक दोघा संशयीतांना घेऊन एटीएस कार्यालयात पोहोचले होते. मालेगाव येथील पीआयएफचा जिल्हाप्रमुख मौलाना सैफू रहमान आणि आणखी एकाला त्यावेळी ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान त्यानंतर आणखी ४ नव्या संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तपास यंत्रणांकडून ताब्यात घेतलेल्यांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. मात्र आता संशयितांची नावे समोर आली आहे.

एनआयए आणि ईडीकडून टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी पीएफआयचे अध्यक्ष परमेश आणि त्यांच्या भावाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पीएफआयचे राष्ट्रीय सचिव बीपी नझरुद्दीन यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. देशाभरातील १३ राज्यांमध्ये छापेमारीचे काम चालू आहे. एनआयए आणि ईडीकडून या प्रकरणी अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर हळूहळू ही संख्या वाढत असून एन आय ए आणि एटीएस पथकाच्या कारवाईची व्याप्ती वाढत असल्याचं चित्र आहे.

राज्यातील बीड, औरंगाबाद, परभणी, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई सह मालेगावमध्ये ही छापीमारी सुरू आहे. मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे या पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या वादग्रस्त संघटनेची देशभरात तीन लाख फॅमिली अकाउंट असल्याची माहिती मिळाली आहे या खात्यामध्ये फॅमिली मेंटेनेस च्या नावाखाली कतार, कुवैत आणि सौदी अरेबियातून ५०० कोटी रुपये आल्याची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!