आडगाव: आडगाव (Adgaon) परिसरातील जत्रा हॉटेल (Jatra hotel) समोर असलेल्या एका अंडारोलच्या गाडीवर ऑर्डर (order) उशिरा देण्याच्या कारणावरून ग्राहक (customer) आणि विक्रेता यांच्यात वाद झाला. या घटनेचे पर्यवसन हाणामारीत होऊन विक्रेता व त्याच्या साथीदारांनी ग्राहकाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या प्रकरणी आडगाव पोलिस स्थानकात (Police station) खुनाचा प्रयत्न (attempt murder) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार अजिंक्य तानाजी लभडे (Ajinkya Tanaji Labhade) (वय २६, रा. लोकधारा सोसायटी, कोणार्कनगर, आडगाव) याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, जत्रा हॉटेल परिसरातील एस.बी.आय. (SBI) बँकेजवळील एका अंडारोलच्या गाडीवर अजिंक्य याने अंडारोलची ऑर्डर दिली होती. अजिंक्य याने अंडारोलची ऑर्डर मला द्यायला उशीर का करत आहात, अशी विचारणा विक्रेत्याला केली. या गोष्टीचा राग आल्याने विक्रेत्याने आपल्या काही साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. विक्रेत्याने काही टवाळखोर साथीदारांना जमा करून अजिंक्य यास शिवीगाळ केली. एका संशयित आरोपीने अजिंक्य यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड टाकला. इतर साथीदारांनी बांबू आणि लोखंडी रॉडच्या (iron rod) सहाय्याने अजिंक्य याच्या दोन्ही हातांना आणि डाव्या पायाच्या नळीवर मारहाण करून जखमी केले. तसेच आरोपींनी अजिंक्यच्या वाहनाला दगड मारून गाडीचे काचा फोडून नुकसान केले.
ही घटना सोमवार (Monday) (दि. ३० मे) रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. दरम्यान, आडगाव पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (PI) शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) तोडकर, पोलिस नाईक आहेर यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेप्रकरणी आडगाव पोलिस स्थानकात दि. ३१ मे रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच शहर पोलिस आयुक्त (Police Commissioner) यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक तोडकर अधिक तपास करत आहेत.