धक्कादायक.! पोलीस ठाण्यातच एकाचा नस कापून आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक; शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यातच एकाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रॉपर्टीच्या आणि घरघुती वादातून हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सचिन रणखंबीरे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याला अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर नस कापण्यापूर्वी सदर व्यक्तीने १५ ते १६ झोपेच्या गोळ्या घेतल्या असल्याची माहिती समोर येत आहे. मानसिक तणावाखाली आल्याने आपण हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सदर व्यक्तीकडून सांगण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहे.