‘धर्मवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी प्रसाद ओकला मानाचा पुरस्कार

By चैतन्य गायकवाड

सध्या राज्यात एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmveer movie) हे दोन्ही विषय चर्चेत आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अभिनेता प्रसाद ओकची (prasad ok) मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनवर (box office collectio) हिट ठरला. ठाणे जिल्ह्यात शिवसेना बळकट करणाऱ्या आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाला आता पहिला पुरस्कार मिळाला आहे.

अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (instagram account) या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याचे फोटो टाकले आहे. धर्मवीर या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली. चित्रपटातील त्याच्या या कामगिरीबाबत त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसादही मिळाला. अभिनेता प्रसाद ओक याने हुबेहूब आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

अभिनेता प्रसाद ओक याला त्याच्या दमदार कामगिरी बाबत ‘शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी प्रसाद ओक म्हणाला, “मला सांगताना अत्यंत आनंद होतोय, की आज धर्मवीरसाठी यावर्षीचा ‘दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ पुरस्कार मला मिळाला. हा सन्मान मी मा. आनंद दिघे साहेबांना समर्पित करतो. ही संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक मित्र प्रवीण तरडे आणि निर्माते मित्र मंगेश देसाई यांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर खा. मा. श्रीकांत शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेही मनःपूर्वक आभार.”

प्रवीण तरडे (Pravin Tarade) दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. काही ठिकाणी हा चित्रपट अजूनही सिनेमागृहात चालू आहे. प्रसाद ओक याने साकारलेले आनंद दिघे लोकांना भावले. अनेक दिग्गज कलावंतानी प्रसाद ओकचे या भूमिकेसाठी कौतुक केले. तसेच प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांना असे वाटले की, हा प्रसाद ओक नाही, तर खुद्द आनंद दिघेच आहेत. प्रसाद ओकच्या अभिनयाचे तसेच प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाचे देखील विशेष कौतुक होत आहे.