बांदेकरांनीआक्षेप घेतलेल्या ‘या’अभिनेत्याला शिंदे गटाने दिले मोठेपद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेनेच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटात सामील झालेल्या अनेक नेत्यांची या यादीत नावं जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी या कार्यकारणीतील एक महत्त्वाचं नाव चर्चेत आलं आहे. ते नाव म्हणजे ज्यांच्यावर शिवसेनेतील नेते आदेश बांदेकर यांनी आक्षेप घेतला होता ते अभिनेते शरद पोक्षे यांना शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मोठे स्थान मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अभिनेते शरद पक्ष यांनी एक पोस्ट केली होती ही पोस्ट शिवसेनेसाठी चांगलीच कळीचा मुद्दा ठरली होती.


त्यानंतर त्यावर शिवसेना आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी अक्षेप घेतला होता. शरद पोक्षे यांनी लिहिलेल्या पोस्टवर आदेश बांदेकर यांनी पोक्षेंचा जुना व्हिडिओ शेअर करत ‘शरद पोक्षे तूच ना ‘असा प्रश्न विचारला होता . त्यावर शरद पोंक्षे यांनी त्यांच्या पुस्तकातील आदेश बांदेकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी लिहिलेल्या मजकूराचा फोटो शेअर करत ‘हा शरद पोंक्षे कधीच काहीच विसरत नाही’, असे उत्तर दिले होते .या वेळी आदेश बांदेकर आणि शरद पोक्षे यांच्यात खडा जंगी पाहायला मिळाली होती आता शरद पोक्षे यांना शिंदे गट शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीत उपनेते पद दिले आहे.

शिवसेनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवसेनेच्या नेते पदी आनंदराव अडसूळ,शिवाजी आढळराव पाटील यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली.  शिवसेनेचे उपनेते म्हणून उदय सामंत, तानाजी सावंत, शरद पोंक्षे, विजय नहाटा, गुलाबराव पाटील, यशवंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.