मुंबई : बॉलिवूडबद्दल नागरिकांच्या मनात नेहमीच कुतूहल असते. त्यातच सलमान खान नावाचे तर प्रचंड चाहते आहेत. त्यात मग तो काय करतोय नक्की सध्या त्याचा आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच धडपडत असतात. अश्यातच सध्या नवी माहिती समोर येत आहे की प्रचंड लोकप्रिय असा ‘शो’ ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाचा आता ‘१६ सिझन’ सप्टेंबर मध्ये येत आहे व ‘बिग बॉस १६ ‘ कार्यक्रम होस्ट करण्यासाठी सलमान खान किती मानधन घेणार आहे. ‘बिग बॉस’ हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. आता पर्यंत या कार्यक्रमाचे १५ सिझन आलेले आहेत. पंधरावा सिझन संपताक्षणी चाहते सोळाव्या सिझन ची वाट पाहत होते. व मध्यंतरी सलमान खान हा शो सोडणार आहे अश्या चर्चाही झाल्या होत्या. पण आता नवी बातमी सोबत येतेय की सलमान खान बिग बॉस सिझन १६ होस्ट करण्यासाठी तीन पट मानधन वाढवून मागत आहे. या शो चा हा सिझन सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
‘बिग बॉस’ शो साठी याधी सलमान खान ला ३५० कोटीच्या जवळपास मानधन मिळायचे, पण आता शो ची वाढती लोकप्रियता आणि मिळत असलेला प्रदिसाद पाहून सलमान खान ने या सिझन साठी इतक्या मानधनाची मागणी केली असावी. सलमान खान ‘बिग बॉस’ हा शो सलग १३ वर्षांपासून होस्ट करत आहे. हा शो त्याचामुलेच लोकप्रिय आहे असेही आपण म्हणू शकतो. पण त्याने कित्येकदा हा शो सोडण्याचा देखील प्रयत्न देखील केला आहे. दरम्यान त्याने एक पत्रकार परिषदेत देखील म्हंटल होत की ‘ जेव्हा जेव्हा हा शो मी सोडायचं ठरवल तेव्हा तेव्हा निर्मात्यांनी शोचा होस्ट राहण्यासाठी मनवल आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जो बिग बॉस चा सोळावा सिझन येत आहे त्याचे सूत्रसंचालन हे सलमान खानच करणार असल्याचे स्पष्ट आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार बिग बॉस 16 आणि बिग बॉस ओटीटी 2 साठी 17 सेलिब्रिटींना संपर्क करण्यात आला आहे. सध्या ही ऑफर कोण घेणार हे स्पष्ट झालेलं नाही आहे. शोच्या निर्मात्यांनी अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, टीना दत्ता, आरुषी दत्ता, पूनम पांडे, शिवम शर्मा, जय दुधाणे, मुनमुन दत्ता, आझम फलाह, कॅट ख्रिश्चन, जन्नत, जुबेर, फैसल शेख, अशी . केविन अल्मासिफर आणि बसीर अलीशी यांच्याशी संपर्क साधला असल्याचे समजते आहे. मग आता यातील कोण कोण ‘बिग बॉस; साठी स्पर्धेत असतील हे बघन उत्साहाच ठरेल.