इंटरनेटमुळे डिजिटल युग निर्माण झाले याचे एक ना आणेल फायदे आपल्याला मिळत आहेत. पण डिजीटल युगाच्या तोट्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, भारतात यावर्षी जूनपर्यंत सायबर सुरक्षेशी संबंधित ६७०००० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी लोकसभेत मंगळवारी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. तर २०१९ पासून या जूनपर्यंत सायबर सुरक्षेची तब्बल ३० लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या चार वर्षात देशातील सायबर सुरक्षेत ३६.२९ लाखांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी खळबळजनक माहितीही मिश्रा यांनी दिली आहे.
मिश्रा यांनी सांगितले की, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमच्या अहवालानुसार आणि ट्रॅक केलेल्या माहितीनुसार, २०१९ ते जून २०२२ पर्यंत देशात ३६.२९ लाख सायबर सुरक्षा घटनांचा मागोवा घेण्यात आला आहे . २०१९ मध्ये सुमारे चार लाख, २०२० मध्ये १२ लाख , २०२१ मध्ये १४ लाख आणि २०२२ मध्ये सुमारे ६.७४ लाख सायबर सुरक्षा घटनांचा मागोवा घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान , देशातील वाढते सायबर हल्ले रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना आखल्या जात असल्याचे मिश्रा यांनी यावेळी सभागृहात सांगितले. अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी सरकारने सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना करत आहोत.
सरकारने मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना सायबर सुरक्षेतील महत्त्वाची भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत . सर्व सरकारी वेबसाइट्स आणि अँप्लिकेशन होस्ट करण्यापूर्वी सायबर सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे . यासाठी सरकारी वेबसाइट्स आणि अँप्लिकेशन्सचे सायबर सिक्युरिटीशी संबंधित ऑडिटही नियमितपणे केले जाते आहे. माहितीची सुरक्षा तपासण्यासाठी सरकारकडे ऑडिटिंग संस्था देखील असल्याचे मिश्रा यांनी यावेळी लोकसभेत सांगितले आहे.
नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. सायबर भामटे कोणत्यातरी लिंक्स च्या मार्फत आपल्या मोबईल, कॉम्पुटर वरती हल्ला चढवतात आणि आपला सर्व डेटा हॅक करतात अश्या ह्या अनोळखी लिंक्स ओपन ना करताच डिलीट करणे गरजेचे आहे. त्यामुळे सायबर हल्ल्यांचे प्रमाण कमी होऊ शकते.