Home » ‘अजित दादा असो नाहीतर कुणीही दादा असो,’ नाशकात सत्तारांचं वक्तव्य!

‘अजित दादा असो नाहीतर कुणीही दादा असो,’ नाशकात सत्तारांचं वक्तव्य!

by नाशिक तक
0 comment

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. दोन्ही राज्यातलं वातावरण तर पेटलेले आहेच मात्र महाराष्ट्रातही राजकारण तापलं आहे. अशात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर नाशिकमध्ये बोलताना आज राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शरद पवारांना द्यायला हवा अशी इच्छा व्यक्त केलीये. शरद पवार ज्येष्ठ नेते असून त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केलाय, त्यांना सीमा प्रश्नाची जाण आहे. ते या प्रश्नाबाबत महाराष्ट्राच्या वतीने बोलले आहे. ते राज्याच्या हितासाठी बोलले, त्यांच्या पाठीशी सर्वांनी असायला हवं असं ते म्हणाले.

अरे ला का रे झालं तर महाराष्ट्र पण मागे राहणार नाही

सीमावाद अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र मराठी माणसाची अडवणूक केली, तर महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे सीमावाद करू नये. केंद्र सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी. आणि महाराष्ट्राला न्याय मिळवून द्यावा. कारण जर अरे ला का रे झालं तर महाराष्ट्र पण मागे राहणार नाही. मराठी माणसावर अन्याय झाला तर राज्यातील एक ही पक्ष एकही माणूस तडजोड करणार नाही. असं सत्तार म्हणाले. कर्नाटक सरकार विरोधात सर्वांनी एकत्र यावं, एकत्र लढलो तर केंद्र सरकारलाही न्याय देण्यासाठी पुढे यावं लागेल. अजित दादा असो किंवा कुणीही दादा असो सर्वांनी एकत्र येवून महाराष्ट्राच्या हिताचे बोलावे, पुढाकार घ्यावा. महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी एकत्र येण्याची भूमिका घ्यावी. सरकार सीमा भागातील नागरिकांच्या पाठीशी असून महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या कर्नाटकच्या लोकांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी. अशी मागणी सत्तारांनी केली आहे.

देशात किती अन्न धान्य, भाजीपाला, पिकं लागेल याचा अंदाज कृषी सहायक देत असतात, मात्र शेतकरी शेजारी इकडे तिकडे पाहून पिकं घेतात. चार पैसे मिळावे ही त्यांची अपेक्षा असते त्यात चूक नाही. वर्धा आणि जालना ड्रायपोर्ट झाले, की शेतमाल निर्यातीसाठी मदत होईल. शेतमालाचे उत्पन्न वाढलं, हे मी गॅरेंटीने सांगतो. मात्र शेतकरी समाधानी नाही, मात्र सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याची नुकसान भरपाई मिळेल. असे आश्वासन त्यांनी दिले.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!