इंग्लंड क्रिकेट टीमला विश्वचषक मिळवून देणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ने एक दिवशी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्टोक्सने सोमवारी ही घोषणा केली त्याच्या निर्णयाने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. बेन स्टोक्स हा इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू वसंत कसोटी संघाचा कर्णधार देखील आहे. आज दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणाऱ्या डरहम या घरच्या मैदानावर स्टोक्स अखेरचा एक दिवसीय सामना खेळणार आहे. बेन स्टोक्सने 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाबाद 84 धावा करत इंग्लंडला विजय मिळून दिला होता.या सामन्याचा स्टोक्स सामनावीर देखील ठरला होता.
बेन स्टोक्स च्या या कामगिरीने इंग्लंडला प्रथमच 50 षटकांचा विश्वचषक जिंकता आला.बेन स्टोक्सने 2011 मध्ये आयर्लंड विरुद्ध च्या सामन्यात क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आत्तापर्यंत बेन स्टोक्स ने एकदिवशीय सामन्यांमध्ये 2919 धावा केल्या आहेत.याचबरोबर गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. आज पर्यंत 74 गडी बाद केले आहेत. इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने स्टोक चा हवाला देत मी मंगळवारी डरहम येथे इंग्लंड विरुद्ध अखेरचा सामना खेळणार असल्याचे म्हटले आहे. बेन स्टोक्स हा आज वयाच्या 31 व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.
दिनेश रामदिन ची क्रिकेटमधून निवृत्ती
वेस्टइंडीज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिन यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले आहे. दिनेश रामदिन ने सोशल मीडियाद्वारे आपल्या निवृत्तीची माहिती दिली आहे. 2019 च्या डिसेंबर मध्ये रामदिन ने वेस्टइंडीज कडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता .