Video : राज, राणे आणि राणा दांपत्य म्हणजे RRR

नाशिक | प्रतिनिधी
औरंगाबाद च्या सभेसाठी राज ठाकरे यांना नियम व अटी घालून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता भाषण तपासण्यास सुरवात केली आहे. त्यातून त्यांनी अतिशय अग्रेसिव्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले असल्याचे दिसून येते. त्यामुळे कारवाई तर होणारच असे सूचक विधान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

दरम्यान महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी औरंगाबाद मध्ये सभा घेतली. या सभेला पोलिसांच्या अनेक नियम अटींवर ही परवानगी देण्यात आली होती. यामध्ये प्रक्षोभक भाषण करण्यास मज्जाव होता. मात्र आता औरंगाबाद पोलीस हे भाषण तपासत असल्याचे भुजबळांनी सांगितले.

आज भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पोलीस कायद्या प्रमाणे काम करतात, त्यामुळे सदर भाषणासंदर्भात न्याय पालिका विचार करणार असून हे सगळं रुटीन आहे, त्यामुळे पोलिसांची नोटीस येणार याची त्यांना देखील मानसिक तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

भुजबळ पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री राणे यांना देखील अटक झाली. त्यानंतर राणा दांपत्याला देखील अटक झाली. या संदर्भात कोर्टाने देखील राणा दाम्पत्याला फटकारले. त्यामुळे कायद्यापुढे कुणाचेही काही चालणार नाही, जे चूक आहे चूक आहे स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडले.

तर राज, राणे आणि राणा म्हणजे आर आर आर चित्रपट असून अस भाषण करताना कारवाई होणार असल्याची तयारी असतेच. आंदोलन करण्यावर ठाम असाल तर पोलीस आपलं काम करतील, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.