‘भुजबळ मुख्यमंत्री झाले असते पण..’ उध्दव ठाकरेंनी सांगितला किस्सा !

राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले “चार महिने अजून सत्ता असती तर छगन भुजबळ हे मुख्यमंत्री झाले असते” अजित पवारांच्या या विधानावर बोलताना “अजित दादा तुम्ही बोलताय की, चार महिने तुम्हाला मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. मी थोडं करेक्शन करतो, भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते. आणि सरकार वाचवण्यामध्ये ते किती वाकबदार आहेत ते तुम्ही मला आता सांगत आहात, खरंतर तुम्ही मला तेव्हा सांगायला हवं होतं. मी पण त्यांना कामाला लावून दिलं असतं”, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली त्यावेळी आम्हाला मोठा धक्का बसला होता, त्यातून सावरायला खूप वेळ लागला, पण भुजबळ जर शिवसेनेत असते तर आधीच मुख्यमंत्री झाले असते असं उद्धव ठाकरे म्हणाले. भुजबळांचे कौतुक मी करण्याची आवश्यकता नाही, नाहीतर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने जमलाच नसता असंही ते म्हणाले. त्यासोबतच “भुजबळ परत आले तर सोबत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत काँग्रेसलाही घेऊन आले” असं देखील विधान यावेळी ठाकरेंनी केलं आहे.

“भुजबळांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली, पण मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली. आपल्याला सगळ्यांना वाटतं पवारसाहेबांनी पंतप्रधानपदी बसावं पण तो योग नाही आला. मला नक्की सांगायला आवडेल. सरकार वाचविण्यात भुजबळ खूप पटाईत आहेत. विलासरावांचं सरकार जाताजाता भुजबळांनी वाचवलं. विलासराव म्हणाले, जाऊद्या सरकार पडतंय आता त्यावर भुजबळ म्हणाले, नाही नाही असं होणार नाही, सरकार वाचणार, अन् ते सरकार भुजबळांच्या प्रयत्नाने पडता पडता वाचलं.. उद्धव ठाकरेसाहेब तुम्हाला १५ आमदार सोडून गेले होते, त्यावेळी जर भुजबळांच्या खांद्यावर पुढची जबाबदारी दिली असती ना तर आज तुम्ही मुख्यमंत्री दिसले असते, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले त्यावर भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटल. त्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

यावेळी भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी त्याचं तोंड भरून कौतुक केलं. नुसते तरुण मनाचे असून चालत नाही. तुमच्या मनात जिद्द असावी लागते एक इच्छा असावी लागते. ती या माणसांमध्ये आहे”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.