Home » नाशिकमध्ये एटीएस, एनआयएची मोठी कारवाई ; पीएफआय संघटनेचे २ जण ताब्यात..!

नाशिकमध्ये एटीएस, एनआयएची मोठी कारवाई ; पीएफआय संघटनेचे २ जण ताब्यात..!

by नाशिक तक
0 comment

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय ही वादग्रस्त संघटना तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. ही संघटना सध्या एन आय ए आणि ईडी या तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आली आहे. या संघटनेवर चापेमारी सुरु असून तब्बल १३ राज्यांमध्ये पीएफआय च्या १०० पेक्षा अधिक ठिकाणावर छापेसत्र सुरू आहे. नाशिकच्या नाशिकमध्ये देखील एन आय ए आणि ईडीने छापे टाकले असून यात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात एकाला मालेगावहून ताब्यात घेतले आहे तर दुसऱ्या एकाला कुठून ताब्यात घेतले याची माहिती अद्याप मिळाली नाहीये.

एनआयए आणि ईडीकडून टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी पीएफआयचे अध्यक्ष परमेश आणि त्यांच्या भावाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पीएफआयचे राष्ट्रीय सचिव बीपी नझरुद्दीन यांना देखील ताब्यात घेण्यात आला आहे देशाभरातील दहा राज्यांमध्ये छापेमारीचे काम चालू आहे. एनआयए आणि ईडीकडून शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रात देखील वीस जणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली असून. महाराष्ट्र एटीएसने विरुद्ध चार स्वतंत्र गुन्हे देखील दाखल केले आहेत. एटीएसची छापेमारी संपूर्ण राज्यात सुरू असून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधून पीएफआयचे नाशिक जिल्हाध्यक्ष मौलाना सैपूर रहमान याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यासह नाशिकमध्ये अजून एक जण ताब्यात घेण्यात आला आहे.

राज्यातील बीड औरंगाबाद परभणी मुंबई आणि नवी मुंबई सह मालेगाव मध्ये ही छापीमारी चालू आहे .तसेच एटीएसने दिलेल्या माहितीनुसार 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे .त्यातील मालेगाव मधील एकाचा समावेश आहे . मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटने कडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे .या संघटनेवर कारवाई करताना रात्री तीन वाजता छापेमारीला सुरुवात केली असून मालेगाव मधून एकाला ताब्यात घेतले आहे . महाराष्ट्रातल्या पुणे, मुंबईसह 20 ठिकाणी NIA, EDने छापे टाकले आहे. तर दिल्ली, एमपी, तामिळनाडू, तेलंगणा, यूपी, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये ही छापेमारी सुरू आहे.

विशेष बाब म्हणजे या पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या वादग्रस्त संघटनेची देशभरात तीन लाख फॅमिली अकाउंट असल्याची माहिती मिळाली आहे या खात्यामध्ये फॅमिली मेंटेनेस च्या नावाखाली कतार ,कुवैत, , आणि सौदी अरेबियातून 500 कोटी रुपये आल्याची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे . त्यामुळे आता देशभरातील राज्यांमध्ये चालू असलेल्या छापीमारीकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे .

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!