मोठी कारवाई! नाशिकमध्ये बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाशकातील जिल्हा रुग्णालयात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा रुग्णालयात पैसे घेऊन बोगस प्रमाणपत्र देणारी मोठी टोळी सक्रीय होती, आता ह्या टोळीचा पर्दाफाश झाला असून नाशिकच्या पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी मोठी कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनेक दिवसांपासून हा गोरख धंदा सुरु असून यामध्ये मोठे बोके घावण्याची पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे. नाशिकसह, धुळे येथील तीन अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक पोलिसांच्या रडारव आहेत. आतापर्यंतच्या तपासात वीस ते पंचवीस बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र पोलिसांनी शोधली असून, जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट मॅनला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक पोलिसांच्या रडारवर

पैसे घेऊन बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणारी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून ही विशेष कामगिरी नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केली आहे. आता नाशिक पोलिसांच्या रडारवर नाशिक, धुळे येथील तीन अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक असून लवकर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सध्या जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट मॅनला पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची अधिक चौकशी सुरु आहे. त्यामुळे आणखीनच मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.

वीस ते पंचवीस बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यास सुरु केली असून आतापर्यंत पोलिसांनी तपासात वीस ते पंचवीस बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र ताब्यात घेतली आहेत. तसेच आणखीही पोलिसांचा शोध सुरु असून यात अनेक जण सापडण्याची शक्यता आहे. रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले असून त्यांच्या पायाची वाळू सरकली आहे.