कर्नाटकात झालेल्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील जनता आता संतापली आहे. तसेच कर्नाटकातील वातावरण देखील तापलेले असून त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्रातून येणाऱ्या एसटी बसेसना कर्नाटकात न पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच एसटी महामंडळानेही एसटी बसेस कर्नाटकात पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागांत वातावरण तापलेले असून तणाव निर्माण झाला आहे. नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहे.
यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्रातून येणाऱ्या एसटी बसेसना कर्नाटकात न पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसटी महामंडळानेही कर्नाटक पोलिसांच्या सुचनेनुसार मोठा निर्णय घेतला असून एसटी बसेसचे होणारे नुकसान लक्षात घेऊन एसटी महामंडळानेही सीमा भागातील गाड्यांना ब्रेक लावला आहे.
मंत्र्यांना साडीचोळी देण्याचा प्रयत्न
ठाकरे गटाकडून मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील यांना साडी चोळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते बेळगाव सीमेवर दाखल झाले आहेत आणि ते बेळगावात जाण्यावर ठाम आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती तणावाची झाली आहे.
संभाजीराजे छत्रपतींकडून सरकारला इशारा
छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.” त्यांनी कर्नाटक सरकारला इशारा देत म्हटलं आहे की, ”रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत. त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल.” असा इशारा त्यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.