नाशिक शहरात पंधरा दिवस मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. आगामी काळातील सण उत्सव सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पोलीस आयुक्तांनी शहरात शांतता राहण्यासाठी मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार शहरात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. सभा घेणे, मिरवणुका काढणे ,तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे, वाहनावर झेंडे लावून शहरात फिरणे ,फटाके वाजवणे घंटानात करणे, तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पुतळे दहन करणे घोषणाबाजी करणे, चितवणीखोर भाषण करणे यामुळे समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे करणे अशा कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सभा किंवा मिरवणुकांसाठी पोलीस आयुक्तालयाची परवानगी बंधनकारक असणार आहे . तसेच लग्नकार्य धार्मिक विधी प्रेतयात्रा ,सिनेमागृह ,यांच्यासाठी हे आदेश लागू राहणार नसल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे . दरम्यान मनाई आदेश काळात शासकीय सेवेतील तसेच परवानगीने शस्त्र वापरणाऱ्यांच्या व्यतिरिक्त, बेकायदा शस्त्र बाळगणे, शारीरिक इजा होईल अशा वस्तू वापरण्यास बंदी असणार आहे.
सध्याचे राज्यातील राजकीय परिस्थिती, तसेच सण उत्सव आणि सध्या स्थितीला चालू असलेले निदर्शने, आंदोलने ,यांसह दीप अमावस्येच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी शहरात पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशानं २८ जुलै २०२२ ते ११ ऑगस्ट २०२२ पर्यंत ( १५ दिवस ) मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत.