मोठी बातमी..! मुख्यमंत्री शिंदेंना धक्का शिंदे गटाचे नगरसेवक ‘या’ पक्षात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे . शिंदे गटात 40 आमदार सामील झाल्यानंतर आता अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक येत असताना खासदारही शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत असताना. आता भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे. शिंदे गटातील नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले आहे.


आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत गवते यांनी पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे जवळपास 14 नगरसेवक आणि नगरसेविका पक्षाला रामराम ठोकून डिसेंबर 2021 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. नवी मुंबईतील भाजपचे 3 नगरसेवक हे शिवसेनेत दाखल झाले होते. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. पण, आता राज्यात पुन्हा शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केला आहे.