मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंच्या दौऱ्या दिवशी शिवसेनेचा विराट मोर्चा


Edited By : Pavan Yeole

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत त्या दिवशी नाशिक मधील शिवसैनिक पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढणार आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे.

18 जुलैला रात्रीच्या सुमारास मध्य नाशिक शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला होता. हा हल्ला शिंदे गटातील लोकांकडून करण्यात आल्याचा आरोप नाशिकच्या शिवसैनिकांकडून करण्यात येतोय. नाशिक मधील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय यांनी ठाण्याच्या काही लोकांना सांगून हल्ला केल्याचा खळबळ जनक आरोप शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तीन दिवसात निलेश कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर तीन दिवसात कारवाई करावी संशयतांना अटक करावी अशी मागणी केली आहे अन्यथा मुख्यमंत्री येणार त्याच दिवशी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार असल्यास देखील यावेळी सांगण्यात आल आहे. त्याचबरोबर महानगरप्रमुख बडगुजर यांनी राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप केला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांसह गुहाटी ला गेले त्यावेळी त्यांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी राज्यात आंदोलन केले होते यादरम्यानच नाशिक शहरात देखील आंदोलन करण्यात आले होते . या आंदोलनात निलेश कोकणे यांचा समावेश होता . त्यामुळे त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या नाशिक मधील निकटवर्तीयांनी हा हल्ला केल्याच्या चर्चा शहरात रंगू लागल्या होत्या. त्यानंतर आता थेट महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हा हल्ला शिंदे समर्थकांनी केल्याचा आरोप केला आहे .