मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Vistar) महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ‘पुढील चार दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे’, अशी माहिती दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना उलटत आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून येत्या चार दिवसात Shinde-Fadanvisहोणार अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी ‘तारीख पे तारीख’ दिल्या जात आहेत. या आधी देखील मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक तारखांचा अंदाज लावण्यात आला होता. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकालात निघण्याची एवढ्यात शक्यता नसल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचे काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे देखील सांगण्यात येत आहे. अशात दीपक केसरकरांनी ही नवी माहिती दिली. असं झाल्यास चार दिवसात मंत्रीपदी कोण-कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी ‘तारीख पे तारीख’
राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा होत्या. अशात १९ आणि २० जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. नवी तारीख सांगितली जातेय. त्यानंतर पुन्हा एक नवी तारीख सांगण्यात आली. यावेळी २६ जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या. मात्र, अद्याप तरी विस्तार झाला नाही. अशात येत्या चार दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असा खुलासा दीपक केसरकर यांनी केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चांना जोर आला आहे.