मोठी बातमी ..! एकनाथ शिंदेंचा लवकरच नवा हिंदुत्ववादी पक्ष?

By Pavan Yeole

शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी वेगळी भूमिका घेत एक गट स्थापन केला आणि महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले ,मात्र या शिंदे गटात असलेल्या काही आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे .त्यांच्यावर सुप्रीम कोर्टात 11 जुलै ला सुनावणी होणार आहे. या आणि त्या आमदारांवर कारवाई होती का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

परंतु आता महाराष्ट्र राज्यात शिवसेनेत वेगळा गट स्थापन केलेले आमदार नवीन हिंदुत्ववादी पक्ष स्थापन करणार असल्याचे संकेत एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असलेल्या एका आमदारांनी दिले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मिलिंद नार्वेकर ज्यावेळी एकनाथ शिंदेंच्या भेटीला सुरत येथे आले होते त्यावेळी कुठलाही प्रस्ताव मांडला नव्हता असा देखील एक धक्कादायक गौप्यस्फोट आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

शिवसेना आणि मुख्यमंत्री शिंदे गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर राज्यामध्ये आणखी एका हिंदुत्ववादी पक्षाची भर पडण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागतो यावरच नवीन पक्षाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहेत.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार झाल्या नंतर आपले चिन्ह आणि आपला पक्ष कुणी आपल्याकडून हिरकून घेणार नाही असे वारंवार शिवसैनिकांना व माध्यमाना सांगत असतात त्यानंतर आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी पक्ष स्थापन होणार असल्याचे संकेत दिले आहे. एकीकडे शिवसेना कोणाची आहे या वर वाद सुरू असताना दूसरीकडे नवीन पक्ष स्थापनेचे संख्येत मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना विधान आले आहे .त्यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे नवीन पक्ष स्थापन करणारा का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.