मोठी बातमी ! त्र्यंबकेश्वर मंदिरातील पेड दर्शन वाद पेटला, प्रकरण थेट उच्च न्यायालयात

नाशिक : कोल्हापूर पाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर मध्ये देखील पेड दर्शनावरून वाद (Trimbakeshwar temple, controversy over paid darshan) निर्माण झाला आहे. त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी दोनशे रुपये घेण्याच्या मंदिर प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. तर पेड दर्शना विरोधात उच्च न्यायालयात (High Court) जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त २०० रूपये प्रतीव्यक्ती आहे. त्यामुळे कोल्हापूर पाठोपाठ आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये देखील पेड दर्शन आणि त्यावरून वाद उभा राहिल्याचे चित्र आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता यावे, रांगेत दिर्घकाळ उभे राहावे लागू नये, यासाठी देवस्थानने २०० रूपये प्रतीव्यक्ती अशा देणगी दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. पण या विरोधात त्र्यंबकेश्वर पण मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता हा वाद पुन्हा एकदा उफाळून येणार आहे. हा प्रकार बंद करून सर्व भाविकांना समान वागणूक देत रांगेतच कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता दर्शन घेण्याची सक्ती करावी अशी विनंती पुरातत्व खात्याने यापूर्वी देवस्थानला पत्राव्दारे केली होती.

कोल्हापुरात वाद : नवरात्रोत्सव काळात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पेड दर्शनाचा निर्णय मंदिर समिती व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्याने कोल्हापुरात पेड दर्शनावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्री उत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील तसेच परराज्यातील भाविकही अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येत असतात. यंदा नवरात्र उत्सव काळात पेड दर्शनाचा निर्णय मंदिर समिती व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. २०० रुपये शुल्क आकारून तासाला सुमारे एक हजार लोकांना दर्शन देण्यात येणार आहे. या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्याने कोल्हापुरात पेड दर्शनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे देवीच्या दारात गरीब श्रीमंत भेद निर्माण होईल त्यामुळे याचा जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्विचार करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. तर अशाच प्रकारचे चित्र आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये देखील पाहायला मिळत आहे. पेड दर्शनावरून त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माझी विश्वस्त ललिता शिंदे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे त्यामुळे आता हा वाद घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.