सर्वसामन्य जनतेला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे . राज्य सरकारने पेट्रोल डिझेल च्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे . पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी केली आहे. राज्य मंत्रीमंडळा च्या झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला आहे .या बरोबरच वेगवेगळी विकासकामे तसेच योजनांच्या अंमलबजावणीवर देखील चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ह्या निर्णयाची घोषणा केली आहे .
“केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात केली होती. राज्य सरकारला देखील कर कमी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य वगळता काही राज्यांनी केंद्राच्या सूचना मान्य करुन इंधनाचे दर कमी केले होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर इंधनाच्या दारात कपात करू अशी घोषण केली होती त्यानंतर आता राज्यात पेट्रोल आणि डिझेल च्या दरात कपात करण्यात आली आहे.
शिंदे -फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत आपल्या युतीच्या सरकारने ठरवलं आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. त्यामुळे आजपासून पेट्रोलचे पाच रुपये तर डिझेलचे दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्य सरकारवर सहा हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी दरकपातीची घोषण करताना सांगितले आहे. पेट्रोल – डिझेलचे दर कमी झाल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार आहे.