मोठी बातमी..! संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीन 31 तारखेला रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर एक ऑगस्टला संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आलं होत यावेळी ईडी ने आठ ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांची कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने एवढ्या दिवसांच्या कोठडीची गरज नसल्याचे सांगत चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ झाली असून संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

त्यांची कोठडी आज संपली त्यानंतर आज त्यांना पुन्हा विशेष PMLA कोर्टात हजर करण्यात आलं. पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने 10 ऑगस्टपर्यंत येडी कोठडी वाढून मागितली होती. काय झालं चौकशीसाठी समाज पाठवले आहे त्यामुळे संजय राऊत यांची कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली. न्यायालयात युक्तिवाद चालू असताना संजय राऊत यांचे वकील अॅड मोहिते यांनी कस्टडी वाढवण्याची गरज नसल्याचे सांगत हे सर्व राजकीय आकसापोटी सुरू असल्याचा आरोप केला आहे .त्याचबरोबर चौकशी कस्टडी शिवायही करता येते असे युक्तिवाद करताना कोर्टात म्हटले आहे.