मोठी बातमी ! शिंदे गटाचे निवडणूकआयोगाला पत्र ,केला शिवसेनेवर दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील चाळीस आमदारांनी वेगळी भूमिका घेऊन एक गट स्थापन केला आणि राज्यात सत्तेवर आले . आमदारांच्यापाठोपाठ आता शिवसेनेतील खासदारही शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांना दुसरा धक्का बसला आहे. शिवसेनेतील 55 पैकी 40 आमदार आणि अठरा खासदारांपैकी बारा खासदार हे शिंदे गटात सामील झाले आहेत . याबरोबरच अनेक महानगरपालिकांमधील नगरसेवक ही शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटाची इनकमिंग वाढत असताना आता शिंदे गटाने खरी शिवसेना आम्हीच आहे असा दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना पक्ष व चिन्हाचा वापर होऊ नये यासाठी आता शिंदे गटाकडून हालचाली सुरू आहेत .शिंदे गटाने लिहिलेल्या पत्राचा तपशील उघड झालेला नाही परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आम्हीच खरी शिवसेना आहे असा दावा करण्यात आला आहे . तर धनुष्यबाण ही निशाणी वापरण्याचा आम्हाला अधिकार आहे. असं पत्रात नमूद करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी यापूर्वी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे . त्यात अशा कुठल्याही प्रकारात आमची बाजू ऐकून घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती.