Edited By: Pavan Yeole
एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना घेऊन महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केली त्यानंतर आता शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे शिवसेना कुणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे . एकनाथ शिंदे सोबत असलेले आमदार सुरत आणि गुवाहाटीत असताना त्यावेळी शिवसेनेकडून शिंदे गटात असलेल्या 16 आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीस विरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तसेच शिवसेनेकडून फुटलेल्या शिंदे गटाने राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार अन्य पक्षात प्रवेश न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे तसेच शिंदे गटाने पाठिंबा देऊन स्थापन केलेले सरकार घटनाबाह्य ठरवावे याच्यासोबतच अनेक गोष्टींना आव्हान देणारी याचिका शिवसेनेने दाखल केली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्ती ला आव्हान देणारी याचिका शिंदे गटाने दाखल केली आहे याच्यावर आज सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय आला आहे.
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही पक्षांच्या वकिलाने युक्तिवाद केल्यानंतर कोर्टाने हा निर्णय उद्यावर ढकलला असून उद्या काय ते ठरवू असं न्यायालयाने म्हटलं आहे. उद्या कोर्टात महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष बाबतची जी पाच याचीक दाखल झाल्या आहेत त्या संदर्भात सुनावणी होणार आहे. न्यायालया बोर्डावर हि पहिलीच केस असणार असून त्यामुळे सकाळ पासूनच सुनावणीला सुरवात होणार आहे. आजहि सरकार स्थापन झाल्यानतर याचिका दाखल झाल्या आहेत त्यावरदोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला . शिंदे गटाच्या वकिलांनी राज्यात सरकार कसे कायदेशीर बनले आहे . हे सांगत आपली भूमिका मांडली तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेमलेल्या वकिलांनी सरकार कसे बेकायदेशीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे . दोन्ही बाजू एकल्या नंतर निकाल राखीव ठेवला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीकडे महारष्ट्रसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
राज्यात झालेल्या सत्तांतर प्रकरणासंदर्भात कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. याच कायदेशीर पेचसंदर्भात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वतीने न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आले आहे. त्या याचिकांवर गेल्या काही दिवसांपासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे .आज कोर्टात या संदर्भात निकाल लागेल असं वाटत असताना आजही न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवत उद्या बघू असं म्हणल्याने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा पेच अद्यापही सुटलेला नाही .