Home » मोठी बातमी ! नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

मोठी बातमी ! नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

by नाशिक तक
0 comment

नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी गडावरून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासत ही चोरी करण्यात आली आहे. दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत मिळून आल्या आहे. सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही असतांना देखील चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या पेक्षाही खळबळजनक प्रकार म्हणजे १३ फेब्रुवारीला चोरीची ही घटना घडली होती आणि ती घटना घडून जवळपास २० दिवस उलटल्यानंतर समोर येत आहे आणि २० दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खर तर ही गोष्ट आश्चर्य व्यक्त करण्यासारखीच आहे. याबाबतीत अद्याप गुन्हा दाखल नसून विश्वस्त ऍड. दीपक पाटोदकर यांनी संस्थान अध्यक्षांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्र दिले आहे.

१३ फेब्रुवारीला चोरीची घटना घडली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासत ही चोरी करण्यात आली आहे. दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत मिळून आल्या आहे. सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही असतांना देखील चोरी झाली आहे. त्यामुळे गडावरील संरक्षणावर प्रश्न उपस्थित होत आहे. या बद्दल आता कधी गुन्हा दाखल होतो आणि काय पाऊले उचलली जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

खर तर गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये चोरीच्या आणि गुन्हेगारीच्या इतरही घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात देवीच्या मंदिरातच चोरट्यांनी डल्ला टाकल्याने खळबळ उडाली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!