मोठी बातमी! उद्धव ठाकरे युतीसाठी तयार,पण.. खा.शेवाळेंचा गौप्यस्फोट

आज दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदारांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेतली या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नवीन गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेच्या बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या वेळी शिवसेना आणि भाजपची युती होण्यासाठी अगोदर प्रयत्न झाले आहेत. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होते असा मोठा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.


त्याचबरोबर पुढे खासदार शेवाळे म्हणालेत आम्ही सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली होती .यावेळी शिवसेनेचे लोकसभा गटनेते विनायक राऊत यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली होती तर खासदारांना कामांच्या बाबतीत न्याय मिळवून देण्याबाबत विनायक राऊत हे सपशेल अपयशी ठरले आहेत .असे देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं आणि कामाच्या बाबतीत गटनेता बदलावा अशी खासदारांनी विनंती केली होती. ती विनंती उद्धव ठाकरे यांनी मान्य केली नाही .

त्यामुळे घटनात्मक अधिकाराने सर्वांच्या संमतीने गटनेता म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे .अशी माहिती देखील यावेळी पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे यांनी दिली आहे. आम्ही कुठलाही गट स्थापन केलेलं नाही, पक्ष बदललेला नाही केवळ गटनेता बदललेला आहे. पक्षाच्या प्रतोद अजूनही भावना गवळी आहेत त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. आणि त्यांच्या मार्फतच हा संपूर्ण निर्णय घेतलेला आहे. असे देखील खासदार शेवाळे यांनी सांगितलेल आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी तयार केलेला वचनांना देखील खासदार राहुल शेवाळे यांनी वाचून दाखवला आहे .


शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना-भाजप युती बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे दोन-तीन वेळा युती करण्यासाठी तयार होते. त्यांची मोदींसोबत एक तास चर्चा झाली होती. शिवसेनचे आमदार बंड करून गुहाटीला गेले होते त्यावेळी मातोश्री वर शिवसेना खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती त्यावेळेस सर्व खासदारांना उद्धव ठाकरेंनी युतीसाठी तयार असल्याच सांगितल होत. आणि युती करण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले होते . भाजप सेना युतीसाठी भाजप पक्षश्रेष्ठी सोबत ठाकरे यांची बैठक झाली होती अश्या प्नरकारचे जे विधान आहे ते शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे .परंतु राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत युती का होऊ शकली नाही याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.