मोठी बातमी! गिरीश महाजनांची दिल्ली वारी; अमित शहांची घेतली भेट

भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. या भेटीबद्दल गिरीश महाजनांनी स्वतः ट्विट (Tweet) करून माहिती दिलीये. ट्विटमध्ये गिरीश महाजन लिहितात ‘केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमित शहाजी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.. विविध विषयांवर मुख्यतः नाशिक व जळगाव जिल्ह्यातील विषयांवर चर्चा केली!’ गिरीश महाजनांनी म्हंटलेल्या या विविध विषयांच्या चर्चेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची चर्चा देखील सामील असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर गिरीश महाजनांबद्दलच्या काही चौकशा केंद्रीय यंत्रणांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्याबद्दलही या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजन भाजपमधील (BJP) बडे नेते आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणात त्यांचा चांगलाच दबदबा आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये त्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यामुळे महत्वाच्या खात्यावर त्यांची वर्णी लागणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. भाजपचे मोठे नेतृत्व म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Maharashtra Cabinet Vistar) काहीतरी शिजलं असावं अशा चर्चांना उधाण आलं आहे. तर या भेटीत काय शिजलं ? गिरीश पालवे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मोठं पद मिळणार का ? असे अनेक प्रश्न राज्याच्या राजकारणात उपस्थित झाले आहे.

.