भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षाचा खळबळजनक प्रताप आला समोर

राज्यात शिंदे – भाजप सरकार सत्तेवर येऊन काही दिवस होत नाही तेच भाजपच्या कार्यकर्त्याचा एक खळबळ जनक प्रकार समोर आला आहे . भाजपा सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबत हॉटेलमधला व्हिडीओ व्हायरल होत असल्याने सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. विरोधकांकडून देखील आता भाजपाला धारेवर धरण्याचा डाव साधला जात आहे. त्यामुळे श्रीकांत देशमुखांची थेट हकालपट्टी करण्यात आली आहे.

सोलापूर भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका रूम मधील व्हडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेनं देशमुख यांच्या दिशेने कॅमेरा पकडत त्यांच्यावर अनैतिक संबंध ठेवत असल्याचा आरोप केला आहे. या व्हिडीओने संपूर्ण भाजप मध्ये एकच खळबळ उडाली आहे.यानंतर भाजपचे देशमुख यांच्याकडून तातडीने राजीनामा घेण्यात आला आहे .देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वीकारला आहे. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.



काय आहे व्हिडिओतील प्रकार

भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका महिलेने सेल्फी कॅमेरामध्ये शूट केलेला दिसून येत आहे. ती महिला रडत रडत येत व्हिडिओत थेट श्रीकांत देशमुख यांच्यावर अनैतिक संबंधाचे आरोप करत आहे. त्यात ती महिला म्हणाली आहे की या माणसाने मला फसवलं आहे बायको सोबत संबंध ठेवून हा माझ्याशी अनैतिक संबंध ठेवत आहे. यांनी मला फसवलं असं म्हणत कॅमेरा संबंधिताकडे वळवत आहे. त्या व्हिडिओत दिसणारी ही व्यक्ती श्रीकांत देशमुख असल्यास समोर आला आहे त्यानंतर व्हिडिओतील व्यक्तींने धाव घेऊन त्या महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आहे.


राज्यात शिंदे – भाजप सरकार आल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजप जिल्हाध्यक्षाच्या प्रतापामुळे भाजपमधील वरिष्ठांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाकडून तातडीने राजीनामा घेण्यात आला आहे. असे असले तरी आता भाजपवर आणि या जिल्हाध्यक्षावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत . हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने भाजपकडून देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. परंतु या व्हिडिओची पडताळणी होऊन लवकरात लवकर कायदेशीर काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे .