आगामी लोकसभेची निवडणूक ही शिवसेना आणि भाजप युतीत लढणार सोबतच आमची जी ताकद आम्ही निर्माण केली आहे त्या ताकदीने शिंदे गटाच्या खासदारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. तसेच ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार अश्या चर्चा होत आहेत यावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, कोण काय म्हणतोय याला राजकारणात महत्व नाही, परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्व आहे, हा काय बोलतो तो काय बोलतो यावर उत्तर देण्याइतका मी रिकामटेकडा नाही.
राज्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारावरून धारेवर धरले असतानाच, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले आहे. ते म्हणाले ‘तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही लवकर मंत्रिमंडळविस्तार होईल, सर्वोच्च न्यायलयाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असे कुठेही म्हणले नाही. न्यायलयीन सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही. असे भाष्य त्यांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांचवर देखील फडणवीसांनी भाष्य केले आहे ते म्हणाले, भाजपने गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेच्या १६ मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ देखील आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघात आम्हाला चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ १६ मतदारसंघात आहेत. या मतदारसंघासाठी काही केंद्रीय नेते प्रभारी म्हणून देण्यात आले आहेत. बारामती मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिली आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीत येमार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
आगामी लोकसभेची निवडणूक ही शिवसेना आणि भाजप युतीत लढणार, विशेष लक्ष असलेल्या १६ मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांचा देखील मतदारसंघ होता. पण जे लोक आता युतीत आमच्यासोबत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. पुढची लोकसभेची निवडणूक ही आम्ही शिवसेना आणि भाजप अशा युतीत लढणार आहोत. त्यामुले जे आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितले. आमची शक्ती त्यांना निवडून आणण्यासाठी खर्ची घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.