Home » भाजप विधानसभेला २०० जागा जिंकणार नाही; जयंत पाटलांची नाशकात भविष्यवाणी

भाजप विधानसभेला २०० जागा जिंकणार नाही; जयंत पाटलांची नाशकात भविष्यवाणी

by नाशिक तक
0 comment

जोर लावण्याचे काम भाजप नेहमीच करत आले त्यांना भीती आहे 105 वरून ते 80 वर येतील 200 च आकडा गाठणार नाहीत अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच निर्मला सीतारामन यांचा छुपा अजेंडा आहे, बारामतीचा आदर्श विकास बघण्यासाठी त्या बारामतीत आल्या असल्याची टीका देखील केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर केला आहे. जयंत पाटील सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.


फडणवीसांनी हे सांगितल्यास त्यांचा सन्मान करू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआने मला संपवायचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप केले होते त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, फडणवीस यांना संपविण्याचा प्रयत्न कधी केला नाही, अशी कुठली कृति केली असेल ती आम्हला संगावी, आम्ही त्यांचा नेहेमी सन्मान केला, त्यांना असे का वाटते माहीत नाही,मी त्यांना निवांत भेटले की त्यांना याबद्दल विचारेल असे उत्तर जयंत पाटील यांनी फडणवीसांना दिले आहे.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमणचा छुपा अजेंडा

भाजप नेत्यांकडून बारामती जिंकणार अशी वक्तव्य करण्यात येत आहे. तसेच आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा होता त्यावर जयंत पाटील म्हणले, बारामती मध्ये राष्ट्रवादीचा पराभव होणार नाही हे भाजप ला ही माहिती आहे. भाजपकडून हवा तयार केली जातेय, प्रचार कॅम्पेन राबविण्यात येत आहे. तसेच निर्मला सीताराम याना त्या भागातील जनतेला प्रश्न विचारायचे होते. चप्पल, कपडे अन्नधान्यवर GST लावला हा प्रश्न लोकांना विचारण्याची संधी मिळाली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, प्रत्येकाला वाटते आपल्या मतदारसंघात काही चांगले करावे, पण काय करायच कळत नाही, निर्मला सीतारामन यांचा छुपा अजेंडा आहे, बारामतीचा आदर्श विकास बघण्यासाठी आल्या एक-दोन भेटी देतील आणि नंतर विकास बघण्यासाठी हळूच जातील असा खोचक टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला आहे.

फडणवीसांवर दिल्लीश्वराची नाराजी होईल म्हणून ते,

वेदांत प्रकल्पावरून जयंत पाटलांनी पुन्हा एकदा विरोधकांना घेरले आहे ते म्हणाले, वेदांत फॉक्सकोन प्रकल्प महाराष्ट्र मधून गेला ही सम्पूर्ण जबाबदारी शिंदे सरकारची आहे. प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनि अग्रवाल यांना भेटले का? , दिल्लीशवरांची नाराजी होईल म्हणून अग्रवाल यांना भेटायलाया घाबरत आहेत. असा सवाल विचारात पाटलांनी जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!