नाशिक : केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर नाशिक मध्ये उभारण्यात येणारा आयटी पार्क (IT Park) नंतरच्या काळात मात्र फिस्कटला. गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी सरकारकडूनही पाठबळ दिलं जात होतं. दरम्यान आता पुन्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्कची घोषणा केली आहे. येणाऱ्या काळात नाशिक मध्ये आयटी व ॲग्रो इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी नाशिकमध्ये केले आहे.
अंबड रेक्रीएशन सेंटर येथे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) व सिन्नर तालुका (Sinnar) औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. यांच्या अडीअडचणीं बाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री सामंत बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनीनाशिकमध्ये आय टी पार्क उभारण्यात येईल अशी ग्याही दिली. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सुरूवातीला १०० एकर मध्ये आयटी क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे कृषी पूरक व्यवसाय व प्रक्रीया उद्योगांना विकसित करण्यासाठी नाशिकमध्ये आयटी व ॲग्रो इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यासाठी शासनामार्फत मदत करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात डाटा सेंटरचा मोठा प्रकल्प लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल’.
इतर सर्व गोष्टींमध्ये परिपूर्ण असणाऱ्या नाशिक शहरात आय टी पार्कची मात्र कमी होती. ही कमी दूर व्हावी तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आय टी पार्क उभारला जाईल अशी ग्वाही काही दिवसांपूर्वी देखील नाशिकला मिळाली होती. नाशिकमध्ये सुद्धा आयटी हब होण्याचा मार्गही मोकळा झाला होता. केंद्र सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवत आयटी हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधांसाठी 20 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र त्यानंतर हा आय ती पार्कचा हा प्रकल्प बासनातच गुंडाळण्यात आला.
नाशिकच्या आडगाव शिवारातील विकास क्षेत्रात आयटी पार्कचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला. त्यानुसार अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. केंद्र सरकारनेही पाठबळ देत या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता. आयटी हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधांसाठी २० कोटी रुपये मंजूर केले होते. आता पुन्हा या प्रकल्पासाठी उदय सामंत यांनी ग्वाही दिली आहे. त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ग्वाहीनुसार ही फक्त एक घोषणाच राहील की नाशिककरांना रोजगार उपलब्ध करून देणारा आयटी पार्क खरोखरच उभारण्यात ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.