पालकानों सावधान! चॉकलेटने घेतला चिमुकल्याचा जीव

नाशिक । प्रतिनिधी
पिंपळगाव बसवंत येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घशात चॉकलेट अडकल्यानं गुदमरून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लक्ष अजय चव्हाण असे चिमुरड्याचे नाव आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे गुरुवारी (दि.३१) रोजी घडली. हे चौदा महिन्याचे बाळ घरात खेळत असताना पालकांनी त्याला चॉकलेट दिले. मात्र ते चॉकलेट बाळाच्या घशात अडकले.

चॉकलेट घशात अडकल्याने बाळाची प्रकृती बिघडली. लागलीच घरातल्या सदस्यांनी बाळाला उचलले आणि नजीकच्या रुग्णालयात नेले. पण, तोपर्यंत चिमुकल्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता.