बॉईज टाऊन पब्लिक स्कूलच्या 10 वीच्या विद्यार्थ्यांचे  घवघवीत यश..!

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल (March-April) २०२२ या महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल (result) आज जाहीर (declared) झाला आहे. या निकालात नाशिक शहरातील बॉईज टाऊन पब्लिक स्कूलचा (Boys Town Public School) निकाल ९९.४० टक्के लागला आहे. या शाळेतील भारती भोंग (Bharti Bhong) या विद्यार्थिनीने ९२.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर ९२.२० टक्के मिळवून परमी गोहिल (Parmi Gohil) ही द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर प्रांजली तागड (Pranjali Tagad) ही विद्यार्थिनी आहे. तिने ९२ टक्के गुण मिळवले. विशेष म्हणजे पहिल्या तिन्ही क्रमाकांवर मुली आहे.

या शाळेतील एकूण १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. ७९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. विद्यार्थ्यांना त्यांच्या या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ व शाळेचे शिक्षकवृंद यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे विश्वस्त श्रीमान नेवील सर यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नाशिक जिल्ह्याचा निकाल ९६.३७ टक्के … नाशिक विभागात नाशिक जिल्ह्याचा निकाल धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon) यांच्या तुलनेत सर्वाधिक लागला आहे. नाशिक जिल्ह्याचा निकाल ९६.३७ टक्के इतका लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील ४० हजार विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. तर ३३ हजार विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व १३ हजार विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी पटकावली आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे. सिन्नर तालुक्याचा निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे.

नाशिक जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल… चांदवड- ९५.७६ टक्के, दिंडोरी- ९६.२५ टक्के, देवळा- ९७.४७ टक्के, इगतपुरी- ९७.२३ टक्के, कळवण- ९६.३९ टक्के, मालेगाव- ९५.१२ टक्के, नाशिक- ९६.३५ टक्के, निफाड- ९५.५१ टक्के, नांदगाव- ९७.१६ टक्के, पेठ- ९५.६६ टक्के, सुरगाणा- ९५.५० टक्के, सटाणा- ९६.४५ टक्के, सिन्नर- ९७.५१ टक्के, त्र्यंबक- ९७.१७ टक्के, येवला- ९७ टक्के, मालेगाव मनपा- ९४.४७ टक्के आणि नाशिक मनपा- ९६.६१ टक्के.