‘या’ कारणामुळे आशिया चषकला बुमराह मुकणार

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषक स्पर्धेत खेळणार नसल्याने भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी हा एक धक्का आहे.या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आणखी वेळ लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे मात्र अद्याप बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही .



बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की जसप्रीत बुमराह सध्या पाठदुखीने त्रस्त असल्यामुळे त्याला आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नाही तो भारताचा मुख्य गोलंदाज आहे आगामी टी – ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेपूर्वी पूर्ण तंदुरुस्ती सह त्याचे पुनारकमल होणे आवश्यक आहे. आशियाई चषक स्पर्धेसाठी त्याची निवड करून आम्हाला धोका पत्करायचं नाही यामुळे त्याची दुखापत आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याचं बीसीसीआय कडून सांगण्यात आले आहे.

येत्या 27 ऑगस्ट पासून अशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. यामध्ये बुमराह हर्षल पटेल हे दुखापत ग्रस्त असून त्यांच्या व्यतिरिक्त ईशान किशन ,संजू सॅमसन , कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळालेले नाही . तर या आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि दुखापतीतून नुकताच सावरलेला लोकेश राहुल यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.श्रेयश अय्यर, अक्षर पटेल,दीपक चहर यांची पर्यायी खेळाडू म्हणून निवड झाली आहे.आशिया कप साठी रोहित शर्मा संघाचा कर्णधार असणार असून राहुल हा उपकर्णधार असणार आहे.