Nashik Burning Bus|नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव; बसला भीषण आग..!

नाशिक : जिल्ह्यात आग्नितांडव सुरु असताना पुन्हा एक आगीची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये वाहनांना आग लागल्याच्या घटना वाढत असताना आता नाशिकच्या चांदवड घाटात बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्णपणे जवळून खाक झाली आहे. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

या आगीत बस पूर्णपणे जवळून खाक झाली आहे. मात्र आग का लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये. सुदैवाने सर्व प्रवासी आग लागताच खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही बस मालेगाव वरून नाशिककडे येत होती. दरम्यान चांदवड घाटात बसने अचानक पेट घेतला. बसने पेट घेताच बस चालक आणि कंडक्टरने सर्व प्रवाशांना प्रसंगावधान राखत तत्काळ खाली उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

आग लागल्याच्या काही क्षणात एखाद्या कागदाप्रमाणे बस राख झाली. मोठमोठ्या आगीच्या ज्वालांनी बसला गिळून घेतले आणि मोठ मोठे धुराचे लोट वर फेकले जात होते. ही आग खूप भीषण होती. प्रवासी तत्काळ खाली उतरले नसते तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान बसला लागलेली आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक विभागाच्या लोकांनी प्रयत्न केली त्यानंतर कुठे आग शांत झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आली.

थोडक्यात बातमी

-नाशिकच्या चांदवड घाटात बस ला भीषण आग

-सुदैवाने सर्व प्रवासी आग लागताच खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली

-आगीत मात्र बस जवळून खाक आगीचे कारण अद्याप स्पष्ट

-मालेगाव वरून नाशिककडे येत होती बस

-बसने पेट घेताच बस चालक आणि कंडक्टरने सर्व प्रवाशांना उतरवले खाली

-स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक विभागाच्या लोकांनी विजवली आज

नाशिक शहरासह जिल्ह्यात बसला आग लागणल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या मध्ये काही घटनांनी महाराष्ट्राला थरारून सोडलं होतं. मिरची चौकातील बसचा अपघात-अगीतांडव, वणी गडावर भाविकांच्या बसला आग, नाशिक मुंबई महामार्गावर बसला आग, चांदवड घाटात बसला आग या शिवाय चालत्या वाहनांना आग अशा घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुरक्षित नाही हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये बसने प्रवास करण्याची भीती वाढू शकते.