‘औरंगाबाद’ शहराचे नाव बदलून ते छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारने मजुरी दिली आहे. या निर्णयाचे एकीकाकडे जोरदार स्वागत करण्यात आले. नाशिक शहरासह राज्यभरात ‘छत्रपती संभाजीनगर’नाव देण्यात आल्याने जल्लोष करण्यात आला. मात्र दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये या निर्णयाला विरोध होत आहे. एम आय एम कडून हा विरोध केला जात असून खासदार जलील या निर्णयाविरोधात उपोषणाला बसले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. यावेळी ‘आय लव औरंगाबाद’ नावाचे फलक घेऊन अनेकजण या उपोषणात सहभागी झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. तसेचराजकारणासाठी शहराचे नाव बदलण्यात आल्याचा आरोप देखील खासदार जलील यांनी केला आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलून छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव करण्याबाबत केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर राज्य शासनाने अधिसूचना काढली. केंद्राच्या या निर्णयाचा एम आय एम कडून कडकडून विरोध करण्यात येत आहे. शहरांची नावे बदलण्यापूर्वी सरकारने हरकती आणि सूचना न मागवता परस्पर निर्णय घेतल्याने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील करण्यात आली होती. दरम्यान आता खासदार जलील या निर्णयाविरोधात उपोषणाला बसले आहे.
दरम्यान जलील हे उपोषणास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासह एमआयएमचे अनेक पदाधिकारी देखील याठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच अनेक वेगवेगळ्या राजकीय संघटनांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर या साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वरिष्ठ अधिकारी देखील उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. तर हे साखळी उपोषण कधीपर्यंत येईल, याबाबत सांगता येणार नसल्याचं जलील म्हणाले आहे.