चांदवड पोलिसांकडून हर घर तिरंगा उपक्रमाची जनजागृती

चांदवड: संपूर्ण भारतात स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याच अनुषंगाने हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. चांदवड मध्ये देखील पोलीस बांधवांनी स्वतंत्र्याचा अमृत हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत जनजागृती करण्यासाठी या मोहिमेत सहभाग घेतला


.चांदवड येथील पोलीस स्टेशन आवारात हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत जनजागृती करण्यासाठी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँक ला बोलावून चांदवड पोलीस स्टेशनला कार्यरत सर्व कर्मचारी व नागरिकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन 25 ते 50 बॅग चे संकलन केल


यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी पोलीस कर्मचारी मंगेश डोंगरे ,मनसाराम बागुल ,सलीम शेख, दीपक मोरे ,बाळू सांगळे ,विजय वाघ, भाऊलाल हेंबाडे , विक्रम बसते, व इतर पोलीस कर्मचारी व होमगार्ड नागरिक उपस्थित होते.