नाशिक : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पेटला असताना आता यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्नाटक सरकारने सोलापुरातील गावांना कर्नाटकात येण्याचं आमंत्रण दिल्यानंतर आता या भागातील दुष्काळग्रस्तांसाठी पाणी सोडण्यासाठी खेळी खेळात महाराष्ट्रातील गावांना आपल्याकडे ओढण्याचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली असताना आता ‘त्याच पाण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही जलसमाधी घेतली पाहिजे’, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.
कर्नाटकाने सोडलेल्या पाण्यातच आणि उपमुख्यमंत्री यांनी जलसमाधी घ्यावी. चुल्लूभर पाण्यात डूबावं, कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तोंडावर थुकतोय. असा संताप संजय राऊतांनी आज नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. ‘या महाराष्ट्रावर अशा पद्धतीने गेल्या ५० ते ५५ वर्षात आक्रमण झालं नाही. बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री डिवचतोय, आव्हान देतोय तुम्हाला. ते जे पाणी सोडलंय ना, त्या चुल्लूभर पाणी में डूब जाव म्हणतो ना आपण.. जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या. तुम्हाला स्वाभिमान असेल तर, असं राऊत यांनी म्हंटलं आहे.
क्रांतीची वांती झाली का ?
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजयांच्याविषयी सतत वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहेत. यावरही यावेळी संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. ‘शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे. शिवाजी महाराज यांचा अपमान हा राज्याचा अपमान नाही का? विखें पाटीलांनी विधान केले होतं, उगाच भावना भडकवितात म्हणून हा देखील अपमान नाही का? मोदींना रावण म्हटलेलं हा गुजरातचा अपमान होतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्याचा अपमान नाही का ? मुख्यमंत्री आम्हाला काय सांगताय तीन महिन्यापूर्वी आम्ही क्रांती केली. शिवरायांचा रोज अपमान होत आहे आता काय झालं, त्या क्रांतीचे वांती झाली का ?’ असा घणाघाती सवाल राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
सुपारी व्यापाऱ्यांवर करावाई झाली, ती मंत्रालयात झाली पाहिजे..तिथे सुपारीबाज
ब्लॅक मनीचा वापर होत असल्याच्या संशयावरून राज्यात ईडीने सुपारी व्यापाऱ्यांवर धाड टाकली. यावर बोलताना ‘सुपारी व्यापाऱ्यांवर करावाई झाली पण ती मंत्रालयात झाली पाहिजे, तिथे सर्व सुपरिबाज आहेत. अशा शब्दांत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
शिंदे गटात गेलेले आमदार आणि खासदार यांनी निवडून दाखवावे
‘नाशिक मध्ये शिवसेना डॅमेज झालेली नाही. फक्त एक दोन आमदार गेले तर पक्षाला नुकसान होईल असे म्हणता येणार नाही. स्थानिक पातळीवर सर्व नेते जागेवर आहेत. शिवसेना आहे तिथेच आहे. जे गेले ते गद्दार आहेच आणि नागरिक त्यांना खोखे वाले बोलत आहे. शिंदे गटात गेलेले आमदार आणि खासदार यांनी निवडून दाखवावे. खासदार गोडसे यांनी निवडून येऊन दाखवावे.’ असे चॅलेंजचं संजय राऊतांनी दिले आहे.