राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची भेट घेतली आहे यावेळी एकनाथ शिंदे हे स्वत: रतन टाटा यांच्या कुलाब्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. देण्यायासाठी पोहचले दरम्यान रतन टाटा यांनी एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. तसंच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठीआणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.रतन टाटा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास ४५ मिनिटे मिनिटे चर्चा झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना रतन टाटा यांच्या प्रकृती बद्दल विचार विचारपूस केली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकार काळात घाईगडबडीत घेण्यात आलेल्या निर्णयांना स्थगिती दिल्या असल्याचे देखील सांगितला आहे.