शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्ता परिवर्तनाच्या केलेल्या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजप सोबत हात मिळवनी करत राज्यात सत्ता स्थापन केली. या शिंदे फडणवीस सरकारमधील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही बाकी असल्याने शिंदे सरकारवर संजय राऊत यांनी निशाणा साधत राज्यात सत्ता परिवर्तनाचे भाकीत केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल, असं भाकीत केले होते. याच वक्तव्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना स्वप्नातच राहू द्या. असे जोरदार प्रत्युत्तर देताना म्हटले आहे.
खासदार संजय राऊत यांनी 16 आमदार अपात्र ठरणार असल्याचा दावा करत आणि कामगार आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले होते
शिंदे गटात गेलेले अनेक आमदार खासदार संभ्रम अवस्थेत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात सत्ता परिवर्तन होईल असा दावा संजय राऊत यांनी केला त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोपच्या फैरी झाडल्या जात आहेत.
सत्ता परिवर्तनावर काय म्हणाले भुजबळ
संजय राऊत यांनी सत्ता परिवर्तनाचे वक्तव्य केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे माजीउपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील माध्यमांशी बोलताना सत्ता परिवर्तनावर बोलताना “संजय राऊत यांना अभ्यास असेल म्हणून त्यावर ते बोलत आहेत मला फारसा अभ्यास नाही” अशी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.