स्वामी नारायणांच्या आशीर्वादाने मी आमदाराचा मुख्यमंत्री: एकनाथ शिंदे

नाशिक : स्वामीनारायण मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम वेळी देखील मी आलो होतो, मात्र तेव्हा मी आमदार होतो पण आज लोकार्पण सोहळ्यात मी मुख्यमंत्री म्हणून आलो हे स्वामीनारायण यांचे आशीर्वाद आहे. नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी, अश्या या कुंभ नगरीत हे एक भव्य मंदिर साकरकण्यात आलंय हे मंदिर शहराची शोभा वाढवेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांनी शहातील बी.ए.पी.एस. स्वामिनारायण मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या महोत्सवासाठी हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते.


आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशकातील पंचवटी परिसरातील भव्य दिव्य असे बी.ए.पी.एस. स्वामिनारायण मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या महोत्सव आज होता. यासाठी मुख्यमंत्री सुमारे ९ च्या दरम्यान त्यांचे आगमन झाले. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे. मंत्र भूमी म्हणून देखील नाशिकचा उल्लेख केला जातो. गोदावरी तटावर नाशिक नगरी वसलेली आहे कुंभ नगरी म्हणून देखील नाशिकची ओळख आहे. अशा या कुंभ नगरीत हे एक भव्य मंदिर साकरकण्यात आलंय. हे मंदिर शहराची शोभा वाढवेल. असे देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.


आमच्या सरकारला पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद

कोरोना काळ असताना देखील हे मंदिराचे काम 3 वर्षात पूर्ण झाले. दोन महिने पाहिले राज्यात नवीन सरकार आलंय हे तुमचं आणि सर्वांचे सरकार आहे. या दोन महिन्यात सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा काम सरकार करत आहे. कोरोना काळात जे निर्बंध लावण्यात आले होते. ते सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहेत निर्बंध मुक्त उत्सव साजरे आता होत आहेत. आमच्या सरकार ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील आशीर्वाद आहे. असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.