Home » सिनेस्टाईल मृत्यूचा थरार..! लाईट गेली अन भावावरच कोयत्याचे सपासप वार

सिनेस्टाईल मृत्यूचा थरार..! लाईट गेली अन भावावरच कोयत्याचे सपासप वार

by नाशिक तक
0 comment

बीड : मध्ये एक सिनेस्टाईल मृत्यूचा थरार गावकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पहिला. घरगुती वादातून चुलत भावानेच १६ वर्षीय भावावर कोयत्याने सपासप वार करत खून केल्याची धक्कादायक घटना घाडली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड गावातील ही धक्कादायक घटना असून घटनेन परिसर हादरून गेला आहे. सुरज श्रीकृष्ण शिंदे (१६) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे सुरज श्रीकृष्ण शिंदे हा रात्री आठच्या सुमारास घरातून बाहेर निघाला होता. श्रीकृष्ण हा गावातील चौकात पोहल्यावर अचानक गावातील लाईट्स बंद झाले. त्यानंतर कोयत्याने श्रीकृष्णवर सपासप वार करण्यात आले. यात तो पूर्ण रक्तबंबाळ झाला. त्याच्यावर हल्ला होत असताना गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांची गर्दी पाहून मारेकरी तेथून पसार झाले. यावेळी गावकऱ्यांनी श्रीकृष्णला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले.

गावकऱ्यांचा आरोप

श्रीकृष्णचे त्याच्या चुलत भावाबरोबर वाद झाले होते. त्याचाच बदला म्हणून श्रीकृष्णच्या चुलत भावाने घेत त्याची हत्या केल्याचे गावकऱ्यांचा आरोप आहे. पोलिसांनी संशयित चुलत भावाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे. श्रीकृष्णचा खरा मारेकरी कोण हे शोधण्यासाठी पोलिसांनी कामात वेग घेतला आहे.

दरम्यान, घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून गावावर शोकाकुल वातावरण पसरले आहे. आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी गावकरी करत आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!