एन सणासुदीत उडाला CNG चा भडका; नाशकातला नवा दर जाणून घ्या…

एन सणासुदीत आधीच महागाई डोईजड असताना आता सीएनजीचे दर भडकले आहेत. राज्यात आधीच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले असतांना दुसरीकडे सीएनजीच्या (CNG) दरातही वाढ झाल्याने नक्कीच नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे. मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात वाढ झाली असून नाशकात ४ रुपयांनी सीएनजी वाढला आहे. त्यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ९६.५० रुपयांवर पोहचला आहे. सणासुदीत आता प्रवास महाग झाला आहे.


सीएनजीच्या दरांचा आलेख वाढताच

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये सीएनजीचे दर प्रतिकिलो ७१ रुपये इतके होते. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस १० रुपयांनी तर जून महिन्यात ४ रुपयांनी वाढ झाली होती. यानंतर आता पुन्हा चार रुपयांची वाढ झाली असून सीएनजीचा भाव ९६ रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचले आहेत.


का वाढताय दर?

नाशिकसह पुण्यात मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहने असल्याने सीएनजी गॅसची (CNG Gas) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच स्थानिक ठिकाणी गॅसची असणारी कमतरता आणि आयात गॅस महाग होणे ही सुद्धा दरवाढीची कारणे आहेत.

सणासुदीचे महागाईचा भडका

आधीच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर महागाईला सामोरे जाता असताना पिळून जात आहेत. त्यात पुन्हा एन सणासुदीचे सीएनजीचे दर वाढले आहेत. सीएनजीचे परवडते त्यामुळे नागरिक सीएनजीकडे वळत आहे. दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने नातवाईक सन साजरे करण्यासाठी एकमेकांकडे येतात या झालेल्या दरवाढीमुळे आता हा प्रवास महागणार आहे. नाशिकमध्ये देखील आता मोठ्याप्रमाणावर वाहने ही सीएनजीचे आहेत. त्यात प्रवासी रिक्षांचा आकडा मोठा त्यामुळे याचा परिणाम प्रवासी रिक्षांवर मोठ्याप्रमात होईल.