छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल आणि भाजपचे प्रवक्ते यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आधीच राज्याचे वातावरण तापलेले असताना भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुन्हा असंच एक विधान करून नवा वाद उभा केला. यावर टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. “मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. तर जो प्रसंग घडला याची तुलना केली. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता,” असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हंटल आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद अजून विझला नवता. तो पुन्हा एकदा भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद उभा केला. प्रतापगड किल्ल्यावर आज ३६३ वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह शिंदे फडणवीस सरकारमधील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील आयोजित कार्यक्रमास उपस्थित होते. दरम्यान “जसं औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होत, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले,” असं पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी केलं.
प्रतापगड किल्ल्यावर आज ३६३ वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवरायांच्या इतिहासातील एका घटनेशी तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली. त्यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी टीका करत शिंदे गटावर निशाणा साधला. “एकीकडे मिंधे गटातील नेत्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाशी करणं चूक आहे. ही तुलना होऊच शकत नाही. हा सगळा महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रयत्न दिसत आहे,” असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. आपल्या या वक्तव्याबद्दल बोलताना “मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. तर जो प्रसंग घडला याची तुलना केली. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता,” असं स्पष्टीकरण लोध यांनी दिले आहे.