‘या’मुळे गोपीचंद पडळकरांविरोधात तक्रार दाखल

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातील वैर काही नवीन नाही. गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी आणि पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही .आता पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध पडळकर बघायला मिळत आहे . आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आली आहे. शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्यावर जो हल्ला करण्यात आला तो राष्ट्रवादी काँग्रेसने केला असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला होता याच वक्तव्याचा निषेध आणि तक्रार म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणारे माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत यांच्या कारवर पुण्यात अज्ञात टोळक्याने यांना हल्ला केला. हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. गळ्यात घालून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांच्या निष्ठे यात्रेत घोषणाबाजी करत होते. यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.


म्हसोबाला नाही बायको सटवाईला नाही नवरा अशी अवस्था राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे अशी भोसरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. तसेच पडळकर पुढे बोलताना पुण्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक नाहीत ते राष्ट्रवादीचेच लोक आहेत असं म्हणत राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता.आता गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनला भेट देत तक्रार दाखल केली आहे.