दारू सोडण्यावरून वाद; वडिलांकडून मुलाचा खून

मुलाने मद्यधुंद अवस्थेत वडिलांना स्वतःच्या लग्नाबद्दल विचारणा केली. वडिलांनी दारू चे व्यसन सोडून दे असे मुलाला सांगितले व मुलाने संतप्त होत वडिलांना शिवीगाळ सुरु केली. व घरात ठेवलेली पहार आणत वडिलांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला आणि जखमी केले. मग वडिलांनीही मुलाला रॉडच्या सहाय्यने मुलाला मारहाण केली. यात मुलाचा मृत्यू झाला. आरोपी वडील यांच्या विरोधात चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , कारभारी रावबा ठोके राहणार पाटे शिवार वय ६० , यांचा मुलगा रविंद्र कारभारी ठोके हा रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दारू पिवून घरी आला. त्यावेळी त्याने वडिलांना विचारले, माझे लग्न कधी करून देता. त्याला वडील म्हणाले तू पहिले दारू सोड. मग लग्नाचे बघू , वडिलांच्या याच बोलण्याचा राग आल्याने संतप्त होत मुलगा रविंद्रने दारूच्या नशेत घरात ठेवलेली लोखंडी पहार वडील कारभारी यांच्या डोक्यात मारली. यात वडील गंभीर जखमी झाले. जीव वाचवण्यासाठी कारभारी ठोके यांनी रविंद्रच्या डोक्यात, हातापायावर लोखंडी पाईप व पहारीने वार केले. या हल्ल्यात मुलगा रविंद्र हा मोठ्या प्रमाणात जखमी झाला व रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.