देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले.. २४ तासांत मोठी रुग्णवाढ..

By चैतन्य गायकवाड |

नवी दिल्ली : देशात नवीन कोरोना रुग्णांच्या (new corona patients in country) संख्येत गेल्या २४ तासांत मोठी वाढ झाली आहे. काल (मंगळवारी) दिवसभरात तब्बल ८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८८२२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे सोमवारी (दि. १३ जून) देशभरात ६५९४ नवीन कोरोना बाधित आढळले होते. परंतु, त्या तुलनेत काल दिवसभरात नवीन नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. ही रुग्ण संख्या वाढ मोठ्या प्रमाणात आहे. या वेगाने वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या ५३ हजार ६३७ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ५७१८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून (Twitter account) ही माहिती दिली आहे.

दरम्यान, देशात रविवारी (दि. १२) नवीन ८०८४ इतक्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि. १३ जून) नवीन कोरीना रुग्णांमध्ये घट झाल्याचे आढळून आले होते. सोमवारी देशभरात ६५९४ नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. त्यानंतर काल दिवसभरात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८८२२ कोरोना रुग्ण आढळले आहे. दरम्यान, काल दिवसभरात ५७१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर कोरोनातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४ कोटी २६ लाख ६७ हजार ०८८ इतकी झाली आहे. कोरोनाच्या नवीन ८८२२ रुग्णांमुळे देशातील आजपर्यंतच्या एकूण कोरोना बाधितांची (total corona cases) संख्या ४ कोटी ३२ लाखांच्या वर गेली आहे. देशात सध्या कोरोना रिकव्हरी दर (recovery rate) ९८.६६ टक्के इतका आहे. तर सक्रीय रुग्णांचा दर (active cases rate) ०.१२ टक्के इतका आहे. देशात दररोजचा सकारात्मकता दर (positivity rate) २ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ४,४०,२७८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे. देशात आजपर्यंत एकूण ८५ कोटी ५८ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे.

राज्यात २९५६ नवीन कोरोना रुग्ण … दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २९५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत राज्यात २१६५ रुगांणाई कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर ४ कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची आकडेवारी १८,२६७ इतकी झाली आहे. दरम्यान, ठाणे शहरात BA.5 या व्हेरिएंटचे आणखी २ नवे रुग्ण आढळले आहेत.